top of page
FB_IMG_1638002119916.jpg

YASHAS BEDARKAR

उत्तम नेतृत्त्वगुण, अस्खलित संभाषणकला, unbiased निर्णयक्षमता आणि कोणत्याही कामात शारीरिक योगदान द्यायची तयारी; हे सगळे गुण ऐकल्यावर ते एखाद्या नेत्याचेच वाटू शकतात! पण नेता आणि समाजसेवक यात एक महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे 'प्रकाशझोताबाहेर राहणं'!  हाच गुण यशसला वेगळं ठरवतो. 

 

Engineeringचं शिक्षण घेत असताना इतर अनेक engineers प्रमाणे काहीतरी चौकटीबाहेर करण्याची धडपड यशसमध्येही होती, फरक इतकाच की यशसने ती कृतीतही उतरवली. 2011 मध्ये परिवर्तनच्या रूपात त्याला लय सापडली, आणि मग नगरसेवक रिपोर्ट कार्ड, iVote campaign, जनलोकपाल अशा एकामागून एक  बऱ्याच कामात त्याने मोठा वाटा उचलला. 

 

काही दिवसांपूर्वी आलेल्या कोकण पुराचं disaster relief campaign परिवर्तनच्या वतीने यशसने lead केलं. पूरग्रस्त भागात काम करताना शारीरिक कामाबरोबर इतर अनेक आव्हानं असतात. नंतर येऊ शकणारे प्रश्न anticipate करून त्यानुसार नियोजन करणं, परिस्थिती नुसार कामं prioritise करणं अशा अनेक जबाबदाऱ्या त्याने समर्थपणे पेलल्या. परिवर्तन बरोबर काम करणाऱ्या मैत्री आणि इतर संस्थांसाठी यशस परिवर्तनचा चेहरा बनलाय. अचूक नेतृत्वाबरोबरच स्पष्टवक्तेपणा, कामाबद्दलची तळमळ, आपल्या खांद्यावरच्या जबाबदारीबरोबरच इतरांच्या कामाची दखल आणि आस्था, अशा अनेक fronts वर यशस उल्लेखनीय काम करतोय.

 

शिक्षण-नोकरी-कुटुंब ,आणि फार फार तर एखादा छंद असं वर्षानुवर्षं चौकोनी आयुष्य जगणाऱ्यांसाठी यशसचं प्रवाहाविरुध्द पण तरीही प्रवाहा'साठी' पोहणं आणि समाजकार्यात समाधानाने भिजूनही  प्रसिद्धीपासून निग्रहाने कोरडं राहणं अत्यंत प्रेरणादायी आहे. इथून पुढेही तो अशाच तळमळीने कार्यरत राहो, ही सदिच्छा!

bottom of page