top of page
FB_IMG_1638001758293.jpg

Aditi Khot

My Story

परिवर्तनचं अंतिम ध्येय हे 'सुशासन' जरी असलं, तरी मुळात हे 'काहीतरी चांगलं' करू पाहणाऱ्या लोकांचं एक छानसं नेटवर्क आहे. आणि या नेटवर्क म्हणून 'काहीतरी चांगलं' नेहमीच घडत असतं.

 

दोनच दिवसांपूर्वी एका कार्यकर्तीने तिच्या ओळखीतल्या एका विद्यार्थिनीचा resume परिवर्तनच्या ग्रुप वर पाठवला. दिल्लीतल्या एका गरीब कुटुंबातील ही हुशार विद्यार्थिनी एखादा  लहानसा जॉब शोधत होती - जेणेकरून त्या कमाईतून ती तिच्या कॉलेज ॲडमिशनच्या फॉर्मची फी भरू शकेल. परिवर्तनची दीर्घकाळ कार्यकर्ती असलेल्या आदितीने ह्या गोष्टीची लगेच दाखल घेतली. दिल्लीतील त्या विद्यार्थिनीशी बोलून, तिचा interview घेऊन, तिला आपल्या @DesRangeela या पुण्यातील व्यवसायात पार्ट-टाईम कामसुद्धा दिलं!

 

आदितीच्या या मदतीमुळेच आता ती विद्यार्थिनी तिच्या कॉलेज ऍडमिशनचा फॉर्म भरू शकणार आहे!

bottom of page