top of page
Square Stage

JAMIL KHOT

कोव्हिड संकटाच्या सध्याच्या काळात पुण्यातील पौड रोड येथील उजव्या आणि डाव्या भुसारी ग्रुपने एक उल्लेखनीय उपक्रम सुरू केला आहे. सौ. मोहिनी दिघे यांच्या पुढाकाराने 'देणं समाजाचं' ह्या कार्यक्रमाअंतर्गत गरजू लोकांपर्यंत डबे पोचविण्याचा हा प्रकल्प. 

 

दोन्ही कॉलनीतील मिळून ३७ स्त्रिया ह्यात योगदान देत असून रोज घरगुती पोळी-भाजीचा एक डबा पुरवत आहेत. Doctors for Beggarsच्या डॉ. मनीषा सोनवणे ह्यांच्या बरोबर हे काम सुरू केलं आहे.

 

ह्या उपक्रमाला जोडून घेत, परिवर्तनचा कार्यकर्ता @Jamil Yakub Khot जमील खोत ह्याने भुसारी कॉलनी ते शिवाजी नगरच्या कार्यालयापर्यंत पुढचे १५ दिवस हे डबे विनाशुल्क पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे.

 

गरज पडेल तिथे Parivartanचे कार्यकर्ते धावून जात आहेत, इतर संस्था/ गटांशी सहकार्य करत काम उभं करतायत. 

आमच्यासाठी ही आहे positivity आणि Jamil Yakub Khot आहे "परिवर्तनाचा शिलेदार" !

bottom of page