top of page
FB_IMG_1638002732971.jpg

BHAKTI BHAVE

समाजसेवक म्हणजे प्रापंचिक व्याप नसलेले,  देशसेवेला वाहिलेले सडफटींग लोक अशी प्रतिमा सहसा जनमानसात असते, फक्त ती थेट बोलायचं धाडस कोणी करत नाही!  पण लोकांच्या typecasted पूर्वग्रहांना फोल ठरवण्यासाठीच काही अपवाद मूर्त रूपात येतात.  भक्ती हा परिवर्तन चा असाच एक सुखद अपवाद आहे,आणि अर्थातच अभिमानही!

 

समाजात खरा बदल घडवण्याची पूर्ण ताकद संविधानात आहे यावर भक्तीचा गाढ विश्वास आहे, आणि त्यासाठी step by step पद्धतशीर approach घेणं भक्तीला रास्त वाटलं, political science मध्ये फॉर्मल शिक्षण घेऊन तिने 'back to basics' सूत्र प्रमाण मानलं, खरी सुधारणा हवी असेल तर घराघरात संविधान पोचलं पाहिजे, कळलं पाहिजे, त्यावर चर्चा घडल्या पाहिजेत हे लक्षात घेऊन 'we, the people' या NGO बरोबर गेली चार वर्षे ती काम करते आहे. त्यांच्या मार्फत अनेक शाळा, कॉलेजेस, संस्थांमधील अनेकांमध्ये संविधान-जागृती, आणि संविधान-शिक्षण देण्याचं काम ती करते.

 

काम करायची आसक्ती स्वस्थ बसून देत नाही,ऊर्मी असली की मार्ग सापडत जातो, दिशा मिळत जाते याची तिलाही प्रचीती आली. प्रबोधन करण्यासाठी चित्रपटांहून बोलकं माध्यम असू शकत नाही हे लक्षात घेऊन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे 'चित्रपट चावडी' नावाचा फिल्म क्लब सुरू करण्यातही तिने पुढाकार घेतला.

 

हेतू निर्भेळ आणि इरादे पक्के असले की समविचारी लोक एकत्र येणं अटळ असतं, त्याच न्यायाने भक्ती आणि परिवर्तनचं एकमेकांना भेटणं क्रमप्राप्त होतं! परिवर्तनच्या नुकत्याच पार पडलेल्या 'नगरसेवक रिपोर्ट कार्डच्या कामातही भक्तीचा मोठा वाटा होता.

 

घर, कुटुंब, परिवर्तन आणि संविधानाबद्दलचं आपलं passion  यातल्या कशातही थोडकंसुद्धा compromise न करता सगळ्या आघाड्यांवर अव्वलरित्या लखलखणं निश्चित शक्य असतं हा विश्वास भक्तीमुळे पुन्हा अधोरेखित होतो.  म्हणूनच अत्यंत यशस्वीरीत्या आपल्या passion ची आपल्या कामाशी सांगड  घालणाऱ्या आमच्या या 'अपवादाचा' आम्हाला अभिमान  वाटतो.🙂

bottom of page