top of page
FB_IMG_1638002667872.jpg

ANIKET RATHI

२०११ साली माझी परिवर्तनशी  पहिली ओळख झाली तेंव्हा मी फक्त एक विद्यार्थी होतो. संविधानाकडून नुकताच मतदानाचा हक्क मिळालेला, पण त्या हक्काच्या ताकदीबद्दल अनभिज्ञ असणारा!

 

२०११ च्या अण्णा आंदोलनाच्या निमित्ताने देशात आणि पुण्यात खऱ्या अर्थी परिवर्तनाचे वारे वाहू लागले आणि त्यामुळे अंगात संचारलेली काहीतरी करू पाहण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. 

 

मग समान ऊर्जा, समान ध्येय आणि समान विचारांचे काही लोक एकमेकांना भेटले, माझ्या प्रयत्नांना दिशा मिळाली आणि माझा एका विद्यार्थ्यापासून एक जबाबदार नागरिक होण्याकडे डोळस प्रवास सुरु झाला.🙂

 

परिवर्तनच्या iVote, NRC,  voters awareness अश्या कित्येक campaigns मध्ये काम करत गेल्यावर नागरिक म्हणून असलेल्या हक्कांबरोबरच कर्तव्याचीही जाणीव झाली, त्या विचारातून माझ्या हडपसर प्रभागात voting awareness चे workshops घ्यायला सुरुवात केली. परिवर्तन मुळे RTI ची ताकद समजली आणि त्याचा प्रभावी वापर करायला मी सुरुवात केली. परिवर्तनचं thought express programs वेळोवेळी मेंदूला खाद्य पुरवत व अडेल तिथे नेमकं मार्गदर्शन करत गेले. माझ्या प्रभागातील लोकांना त्यांच्या तक्रार निवारणासाठी काय पावलं उचलावी लागतात यासाठी प्रशिक्षित केलं, त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करायला मदत केली.करोना काळ तर सगळ्यांची परीक्षा पहाणाराच होता! त्यावेळी परिवर्तन,पुणे जिल्हा माहेश्वरी युवा समिती, रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याबरोबर प्लाझ्मा donation ची मोहिम राबवली, कोविड काळात पोलिसांच्या मदतीसाठी 'special police officer' म्हणून माझी नेमणूक हडपसर पोलिस station कडून करण्यात आली.

 

व्यवसायाने विमा सल्लागार किंवा पेशाने marketing counselor असलो तरी माझा पिंड समाजसेवकाचा आहे असं मला कायम वाटतं.🙂 "समाजकार्याचा मी एकट्यानेच मक्ता घेतलाय का"असा विचार अनेकवेळा सामान्य नागरिक करतो, पण त्यावेळी मी आवर्जून हा विचार करतो, की या सगळ्याकडे 'मक्ता' म्हणून पाहण्याऐवजी 'वसा' म्हणून पाहूया. कारण सक्षम प्रशासनाचं आणि सुव्यवस्थेचं स्वप्न तर आपण सगळ्यांनीच पाहिलंय! आणि महत्त्वाचं म्हणजे , काम कितीही लहान स्तरावर असलं तरी रामसेतू उभारण्यामधला खारीचा वाटा कोणी  नाकारू तर शकत नाही!"🙂

bottom of page